Skip to main content
- सर्वप्रथम एक गोष्ट क्लिअर करतो ती म्हणजे अशी की, आम्ही निर्मल मॅट्रिमोनी मध्ये लग्न जमवण्यासाठी प्रयत्न नक्की करतो पण लग्न जमेलच याची कुठलीही गॅरंटी देत नाही.
- नांव नोंदणी किती सालची, कशी होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे रजिस्टर होतील ती सर्व स्थळं मिळतील.
- तुमच्या स्थळाला समोरच्या स्थळाकडून कसा प्रतिसाद मिळेल किंवा मिळणार नाही याला मॅट्रिमोनी जबाबदार राहणार नाही
- तुमचे जे काही उत्तर असेल ते लवकरात लवकर एकमेकांना कळवावे.
- लग्न ठरल्यानंतर लवकरात लवकर मॅट्रिमोनी मध्ये कळवावे.
- कोणत्याही कारणाने नांव कॅन्सल केल्यावर कोणत्याही प्रकारे स्थळं बघता येणार नाही व कॅन्सल नांव परत नोंदवातांना परत नविन नांव नोंदणी करावी लागेल.
- एकदा भरलेली फि परत मिळणार नाही व ती दुसऱ्याच्या नावाने पण ट्रान्सफर पण केली जाणार नाही.
- नांव नोंदणी करताना स्थळाबद्दलची खरी माहिती फॉर्ममध्ये भरावी.भरलेल्या माहिती संदर्भात मंडळ व मंडळा संबंधित कोणी जबाबदार राहणार नाही.
- तुम्ही पसंत केलेल्या स्थळाची माहिती खरी आहे याची पडताळणी तुम्हीच लग्नापूर्वी चौकशी करून करावी व मगच लग्न संदर्भात अंतिम निर्णय घ्यावा.पुढे काही प्रश्न निर्माण झाल्यास त्यास मंडळ व मंडळ संबंधित कोणी जबाबदार राहणार नाही.
- स्थळांच्या माहितीचा कोणीही गैरवापर करू नये तसे केल्यास लगेच सभासदत्व रद्द केले जाईल.
- नोंदणी केलेल्या स्थळाने नोंदणी न केलेल्या स्थळाला मंडळातील रजिस्टर स्थळांचे संपर्क देऊ नये त्या ऐवजी त्यांना मंडळात नांव नोंदणी करण्यास सांगावे.कारण नविन नांव नोंदणीचा फायदा सर्वांनाच होऊ शकतो.
- स्थळे घेताना शैक्षणिक पात्रता,आर्थिक पात्रता,शारीरिक पात्रता,वय पात्रता इत्यादी बाबी बघून अनुरूप अशीच स्थळं घ्यावीत.
- पसंत केलेल्या स्थळांना तुम्ही स्वतः संपर्क करून पुढची बोलणी करावी.मंडळ फक्त स्थळं पुरविण्याचे माध्यम म्हणून काम करेल.
- वरील सर्व नियम व अटी मान्य असेल तरच नाव नोंदणी करावी.