नमस्कार,
मी अमित अशोक शिरबावीकर. या निर्मल मॅट्रिमोनी चा संस्थापक आणि डायरेक्टर या नात्याने आपल्या या निर्मल मॅट्रिमोनी ची आपल्याला थोडक्यात ओळख करून देतो...
निर्मल म्हणजेच ए वन,म्हणजेच अतिसुंदर-अतिउत्तम निर्मळ असं... प्रत्येकाचचं एक स्वप्न असतं की त्याला एक चांगला लाइफ पार्टनर मिळावा... आणि आपण नेमकं हेच स्वप्न आपल्या या निर्मल मॅट्रिमोनी च्या माध्यमातून साकार करण्याचा प्रयत्न करणार आहोत... हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी आपल्या या निर्मल मेट्रोमोनी ची 2011 साली स्थापना केली...
लग्नाच्या गाठी देव स्वर्गात बांधतो हे जरी खरं असलं तरी त्यातली "आपली नेमकी गाठ" शोधून काढण्यासाठी आपली ही मेट्रोमोनी हे एक माध्यम म्हणून तुम्हाला मदत करणार आहे. तुम्ही आपल्या या मेट्रोमोनी वर विश्वास दाखवून नांव नोंदवताय याबद्दल मी सर्वप्रथम तुमचे आभार मानतो आणि तुम्ही या मॅट्रिमोनी वर दाखवलेला विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन.
जाता जाता फक्त एकच सांगेन, "अपेक्षांचं झाड आजकाल जरा जास्तच फोफावत चाललंय" आणि नेमकं याचमुळे लग्न ठरायला विलंब होतोय.. अपेक्षा नसाव्यात असं मी म्हणत नाही,अपेक्षा असाव्यात, जरूर असाव्यात, फक्त त्या अराजक नसाव्यात..जेणे करून लग्न ठरायला उगाच विलंब होणार नाही.
धन्यवाद!!
आणि तुमच्या जीवनातील पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
अमित अशोक शिरबाविकर
फाऊंडर,डायरेक्टर - निर्मल मॅट्रिमोनी